मुंबईतील लाखो हिंदूंचं श्रद्धास्थान असणाऱ्या दादरच्या श्रीसिद्धिविनायक मंदिर परिसरात उभ्या राहिलेल्या एका अनधिकृत चर्चसदृश्य चॅपेलमुळे नवा वाद निर्माण झाला आहे. सिद्धिविनायक मंदिर आणि प्रभादेवी मेट्रो स्टेशनाजवळ अभ्या राहिलेल्या चॅपेलला हिंदू समाजाकडून विरोध होतो आहे. हे अनधिकृत बांधकाम तातडीनं हटवण्याची मागणी समाज माध्यमात जोर धरु लागली आहे. सिद्धिविनायक मंदिर परिसरात असं चॅपेल अनधिकृतरित्या कसे उभे राहू शकते, असा संतप्त सवाल विचारण्यात येतो आहे.(Siddhivinayak Chapel Controversy) सिद्धिविनायक मंदिराला लागून उभ्या असलेल्या या बेकायदेशीर वास्तूचा नेमका हेतू काय, असा सवाल उपस्थित करण्यात आलाय. ख्रिश्चन धर्मप्रचार आणि धर्मांतराच्या प्रेरणेसाठी हे सुरु आहे का, असा सवाल करण्यात आले आहेत. धार्मिक स्थळांभोवती अनधिकृत बांधकामे, अतिक्रमण किंवा परवानगीविना उभारलेल्या बांधकामांवरुन मुंबईत यापूर्वीही वाद झाले आहेत. आता या प्रकरणात हिंदुत्ववादी संघटना आणि काही राजकीय पक्षही आक्रमक होताना दिसत आहेत.(Siddhivinayak Chapel Controversy)